२०२४ उन्हाळी ऑलिंपिक (फ्रेंच: Jeux olympiques d'été de 2024)) ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची ३३वी आवृत्ती युरोप खंडातील फ्रांस देशाची राजधानी पॅरिस शहरामध्ये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ मध्ये खेळवण्यात येईल. या स्पर्धेतील अनेक खेळ पॅरिसमध्ये असून इतर १६ शहरांत ही काही स्पर्धा होतील तसेच ताहिती या फ्रांसच्या प्रदेशात एक स्पर्धा होईल.
या स्पर्धेत सुमारे १०,५०० खेळाडू ३२ खेळांतील ३२९ स्पर्धांमध्ये भाग घेतील.
खालील देश किमान एक खेळाडू २०२५ उन्हाळी स्पर्धांमध्ये पाठवतील. नुइ आणि ताहिती पहिल्यांदाच ऑलिंपिक स्पर्धामध्ये भाग घेतील.
२०२२मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने रशिया आणि बेलारुस देशांना स्पर्धांमध्ये भाग घेण्यास मज्जाव केला आहे. तेथील खेळाडू स्वतंत्र खेळाडू म्हणून या स्पर्धेत भाग घेतील.[१][२] अशा खेळाडूंनी रशियाकडून आक्रमणात थेट भाग घेतला असल्यास त्यांना वगळण्यात येईल.[३] त्यांना आपल्या देशाचा ध्वज वापरण्याची मुभा नाही.[४]