१९७६ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची एकविसावी आवृत्ती कॅनडा देशाच्या माँत्रियाल शहरामध्ये जुलै १७ ते ऑगस्ट १ दरम्यान खेळवली गेली. कॅनडा देशाने आयोजीत केलेली ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.
ह्या स्पर्धेच्या खर्चामुळे यजमान माँत्रियाल शहर मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाले. हे कर्ज पूर्णपणे फेडण्यासाठी त्यांना पुढील ३० वर्षे लागली.
सहभागी देश
ह्या स्पर्धेत एकूण ९२ देशांनी सहभाग घेतला ज्यांपैकी ३ देशांची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती.
खालील आफ्रिकन देशांनी ह्या स्पर्धेवर बहिष्कार टाकला होता. बहिष्काराचे कारण आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीनेन्यू झीलंड ऑलिंपिक संघाला ह्या स्पर्धेत सामील होण्याची दिलेली संधी हे होते. दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेषी धोरणांमुळे त्या देशावर बंदी आणलेली असतानाही न्यू झीलंड राष्ट्रीय रग्बी युनियन संघाने दक्षिण आफ्रिका दौरा केला होता. ह्यामुळे