पनामाचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de Panamá) हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांना जोडणाऱ्या एका चिंचोळ्या संयोगभूमीवर वसलेल्या पनामाच्या पश्चिमेला कोस्टा रिका, आग्नेयेला कोलंबिया, उत्तरेला कॅरिबियन समुद्र व दक्षिणेला प्रशांत महासागर आहेत. पनामा सिटी ही पनामाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
१६व्या शतकापासून स्पेनची वसाहत असलेल्या पनामाने १८२१ साली स्पेनपासून वेगळे होऊन ग्रान कोलंबियाचे प्रजासत्ताक नावाचे संयुक्त राष्ट्र स्थापन केले. १९०३ साली अमेरिकेच्या पाठिंब्यावर पनामा कोलंबियापासून स्वतंत्र झाला. ह्याच वर्षी बांधला गेलेला व पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर यांना जोडणारा पनामा कालवा हा जगातील सर्वात महत्त्वाच्या कृत्रिम जलमार्गांपैकी एक आहे. सध्या पनामाच्या मिळकतीचा मोठा हिस्सा ह्या कालव्याच्या करामधून येतो.
इतिहास
१६ व्या शतकापासून स्पेनची वसाहत असलेल्या पनामाने १८२१ साली ग्रान कोलंबियाचे प्रजासत्ताक नावाचा देश स्थापन केला.अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या पाठिंब्याने १९०३ साली पनामा कोलंबियाच्यापासून स्वतंत्र झाला.
नावाची व्युत्पत्ती
पनामा हे नाव पनामा कालव्यापासून आले आहे.
प्रागैतिहासिक कालखंड
भूगोल
चतुःसीमा
राजकीय विभाग
मोठी शहरे
समाजव्यवस्था
वस्तीविभागणी
धर्म
शिक्षण
संस्कृती
राजकारण
अर्थतंत्र
खेळ
बाह्य दुवे