साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह हा युनायटेड किंग्डमचा दक्षिण अटलांटिक महासागरातील एक प्रदेश आहे. ह्यातील साउथ जॉर्जिया हे सर्वात मोठे बेट आहे तर साउथ सँडविच हा अनेक लहान बेटांचा समूह आहे.
साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूहावर मनुष्यवस्ती नाही, येथे फक्त युनायटेड किंग्डम सरकारचे अधिकारी व शास्त्रज्ञ राहतात.