लॅटिन अमेरिकेमधील अनेक देशांप्रमाणे स्पेनची वसाहत असलेल्या इक्वेडोरला १८२२ साली स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर अल्प काळाकरिता ग्रान कोलंबियाचा भाग असलेला इक्वेडोर १८३० साली पूर्णपणे स्वतंत्र देश बनला.
इतिहास
स्पॅनिश लोक दाखल होण्याआधी येथे स्थानिक अमेरिकन व इंका जमातीचे लोक वास्तव्यास होते. १५व्या शतकाच्या उत्तरार्धामधील अंतर्गत कलहामुळे इंका साम्राज्य डळमळीत झाले होते. इ.स. १५३१ साली फ्रांसिस्को पिझारो ह्या भागात पोचला व स्पेनने हळूहळू आपले अस्तित्त्व वाढवण्यास सुरुवात केली. लवकरच इक्वेडोर प्रदेश पेरूची व्हॉईसरॉयशाही ह्या वसाहतीमध्ये विलिन करण्यात आला व १५६३ साली क्वितोला प्रशासकीय जिल्हा बनवण्यात आले.
सुमारे ३ शतके स्पेनच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर १८२० साली ग्वायाकिल हे स्वातंत्र्य मिळवणारे इक्वेडोरमधील पहिले शहर होते. त्यानंतर २४ मे १८२२ रोजी आंतोनियो होजे दे सुक्रच्या सैन्याने येथील स्पॅनिश राजवटीचा पराभव केला व इक्वेडोरला स्वातंत्र्य लाभले. स्वातंत्र्यानंतर लगेचच इक्वेडोर सिमोन बॉलिव्हारने स्थापन केलेल्या ग्रान कोलंबियाचे प्रजासत्ताक ह्या राष्ट्रात सामील झाला. १८३१ साली ग्रान कोलंबिया कोलमडुन पडला व त्यामधून व्हेनेझुएला, इक्वेडोर व नवीन ग्रानादा हे तीन स्वतंत्र देश निर्माण झाले. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे इक्वेडोर व पेरूदरम्यान भूभागांबद्दल वाद सुरू होते. १९७२ ते १९७९ दरम्यान इक्वेडोरमध्ये लष्करी राजवट होती. १९७९ सालापासून मात्र येथे लोकशाही असून रफायेल कोरेया हा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे.
नावाची व्युत्पत्ती
प्रागैतिहासिक कालखंड
भूगोल
२,८३,५६० चौरस किमी इतके क्षेत्रफळ असणारा इक्वेडोर हा दक्षिण अमेरिकेमधील लहान देशांपैकी एक आहे. पश्चिमेस इक्वेडोरला २,३३७ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून पूर्वेकडील भाग घनदाट ॲमेझॉन जंगलाने व्यापला आहे. आन्देस पर्वतरांग इक्वेडोरच्या मध्यभागामधून उत्तर-दक्षिण धावते.
ऑण्ड्रिज पर्वताच्या दोन रांगा या देशातून उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे जातात. यामुळे हा देश समुद्रकिनाऱ्याकडील भाग, पर्वतीय भाग आणि पूर्व भाग अशा तीन क्षेत्रात विभागला गेला आहे.