सरकार ही जगातील एखादे राज्य, देश अथवा संस्था चालवण्यासाठी बनलेली प्रणाली आहे. प्रशासन हा शब्द देखील अनेक वेळा सरकारला समानार्थी वापरला जातो. सरकार हे धोरणे व कायदे ठरवण्यासाठी तसेच दैनंदिन राज्यकारभार चालवण्यासाठी जबाबदार असते. उदा. भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन.
प्रागैतिहासिक ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटोने पाच प्रकारांच्या सरकारांची चर्चा केली आहे. उच्चवर्गशाही, धनवर्गशाही अल्पवर्गशाही, लोकशाही व अत्याचारशाही.
येथे राष्ट्राध्यक्ष सरकारचा कार्यशील भाग व सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा प्रमुख असतो:
राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुख तसेच सरकारप्रमुख असतो.
येथे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान दोघांनाही संविधानिक अधिकार असतात. राष्ट्राध्यक्ष हा सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा प्रमुख तर पंतप्रधान हा सरकारप्रमुख असतो.
येथे सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा प्रमुख पंतप्रधान असतो. ह्या प्रकारामध्ये राष्ट्राध्यक्षाला केवळ औपचारिक संविधानिक अधिकार असतात व त्याचे महत्त्व केवळ नाममात्र असते.
राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख एकत्रितपणे निवडला जातो. परंतु तो संसदेला उत्तरदायी नाही.
संचालक पद्धतीमध्ये कार्यकारिणी समितीकडे प्रशासकीय अधिकार असतात. ही समिती संसदेद्वारे निवडली जाते.
ह्या पद्धतीत राष्ट्रप्रमुख हा राजा किंवा राणीच्या स्वरूपात असतो. त्यांचे अधिकार संविधानिक कायद्याने आखून दिले आहेत.
येथे सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा प्रमुख पंतप्रधान असतो.[६][७] राष्ट्रप्रमुखाचे स्थान राजा/राणीकडे असते व ज्यांना केवळ औपचारिक अधिकार असतात.
पंतप्रधान सरकारप्रमुख असला तरीही राजा/राणीला महत्त्वाचे राजकीय अधिकार आहेत.
येथील राजा/राणीची देशावर संपूर्ण पकड असून ते संविधानिक कायद्याला बांधील नाहीत.
देश जेथे राष्ट्रप्रमुख धर्मावर आधारित वर्गीकरणाद्वारे निवडला जातो..
येथे केवळ एकच राजकीय पक्ष अस्तित्वात असून संविधानाने ह्या पक्षाला संपूर्ण अधिकार दिले आहेत.
येथे देशाची सत्ता लष्करी अधिकाऱ्यांच्या हातात असते.
देश जेथे सत्तापरिवर्तन होत आहे.
जगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी