मोझांबिक हा आग्नेय आफ्रिकेतील एक देश आहे. मोझांबिकचा शोध वास्को दा गामाने १४९८ साली लावला व १५०५ मध्ये पोर्तुगीजांनी तेथे आपली वसाहत स्थापन केली.
१९७५ साली पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९७७ ते १९९२ दरम्यान मोझांबिकमध्ये अंतर्गत युद्ध चालू होते. ह्या युद्धात सुमारे ९ लाख लोक मृत्यूमुखी पडले.
मोझांबिक जगातील सर्वात गरीब व अविकसित देशांपैकी एक आहे. सरासरी आयुष्य, बालमृत्यूचे प्रमाण इत्यादी बाबींमध्ये मोझांबिक हा जगातील सर्वात मागासलेला देश आहे.
खेळ