मालीचे प्रजासत्ताक (फ्रेंच: République du Mali हा आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागातील एक देश आहे. मालीच्या उत्तरेला अल्जीरिया, पूर्वेला सुदान, दक्षिणेला बर्किना फासो व कोत द'ईवोआर, आग्नेयेला गिनी तर पश्चिमेला सेनेगाल व मॉरिटानिया हे देश आहेत. १२,४०,१९२ चौरस किमी क्षेत्रफळ असणाऱ्या मालीची लोकसंख्या सुमारे १.४५ कोटी आहे. बामाको ही मालीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मालीमधील बहुतांशी लोकवस्ती दक्षिण भागात नायजर व सेनेगाल नद्यांच्या काठावर वसलेली आहे. मालीचा उत्तर भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे
१९व्या शतकाच्या अखेरीस फ्रेंचांनी मालीवर सत्ता प्रस्थापित केली व फ्रेंच सुदान ह्या वसाहतीमध्ये मालीचा समावेश केला. १९६० साली मालीला स्वातंत्र्य मिळाले.
शेती हा मालीमधील सर्वात मोठा उद्योग असून कापसाची निर्यात हा मालीच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जगातील सर्वात गरीब व कर्जबाजारी देशांपैकी एक असणाऱ्या मालीमधील ६४ टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली राहते.[३]युरोपियन संघ, जागतिक बँक इत्यादींकडून मालीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनुदान मिळते.
फ्रेंच ही मालीची राष्ट्रभाषा असून येथे ४० पेक्षा अधिक स्थानिक भाषा वापरल्या जातात. मालीमधील ९० टक्के जनता मुस्लिम धर्मीय आहे
इतिहास
नावाची व्युत्पत्ती
प्रागैतिहासिक कालखंड
भूगोल
चतु:सीमा
राजकीय विभाग
माली देश एकूण ८ प्रदेशांमध्ये विभागला गेला असून उत्तरेकडील ३ प्रदेशांमध्ये तुरळक वस्ती आहे.