मलावीचे प्रजासत्ताक हा दक्षिण पूर्व आफ्रिकेतील एक चिंचोळा भूपरिवेष्ठित देश आहे. १९६४ सालापर्यंत ब्रिटिश वसाहत असलेला हा देश न्यासालॅंड ह्या नावाने ओळखला जात असे. मलावीच्या उत्तर व पूर्वेला टांझानिया, पश्चिमेला झांबिया तर इतर दिशांना मोझांबिक हे देश आहेत. मलावीच्या पूर्वेस न्यासा हे आफ्रिका खंडामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे. लिलॉंग्वे ही मलावीची राजधानी व सर्वात मोठे शहर असून ब्लॅंटायर हे येथील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे मलावी गरीब व अविकसित आहे. येथील बालमृत्यूचे प्रमाण अत्यंत तीव्र असून एड्स ह्या रोगाने मलावीला ग्रासले आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. जगातील इतर देशांकडून मिळणाऱ्या अनुदानावर मलावी अवलंबुन आहे.
इतिहास
भूगोल
मोठी शहरे
समाजव्यवस्था
खेळ
बाह्य दुवे