लेसोथो हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. लेसोथोच्या चारही बाजुंना दक्षिण आफ्रिका देशाच्या सीमा आहेत. दुसऱ्या स्वतंत्र देशाच्या पुर्णपणे अंतर्गत असलेला लेसोथो जगातील केवळ ३ देशांपैकी एक आहे (सान मारिनो व व्हॅटिकन सिटी हे इतर दोन्ही देश इटलीमध्ये आहेत.) मासेरु ही लेसोथोची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
१८६८ सालापासून ब्रिटिश साम्राज्याचे मांडलिक राष्ट्र राहिल्यानंतर १९६६ साली लेसोथोला स्वातंत्र्य मिळाले. सध्या लेसोथो राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे सांसदीय संविधानिक राजेशाही प्रकारचे सरकार आहे. येथील राजाला औपचारिक महत्त्व असून सर्व संविधानिक अधिकार संसद सांभाळते. लेसोथोची अर्थव्यवस्था शेती, खाणकाम, उत्पादन इत्यादी उद्योगांवर अवलंबून असून येथील ४० टक्के लोक आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषेच्या खाली जगतात.
ह्या भागातील इतर देशांप्रमाणे लेसोथोदेखील एड्सच्या मगरमिठीत अडकला आहे. २००९ मधील पाहणीनुसार येथील २३.६ टक्के लोकांना एच.आय.व्ही. विषाणूची लागण झाली आहे व येथील सरासरी आयुर्मान केवळ ४२ वर्षे आहे. एड्सचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू असून ह्या प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
इतिहास
नावाची व्युत्पत्ती
प्रागैतिहासिक कालखंड
भूगोल
लेसोथो आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागात स्थित असून तो चारही बाजूने दक्षिण आफ्रिका देशाने वेढला गेला आहे. संपूर्णपणे १,००० मीटर (३,३०० फूट) पेक्षा अधिक उंचीवर वसलेला लेसोथो हा जगातील एकमेव स्वतंत्र देश आहे. ह्या उंचीमुळे येथील हवामान शीतल असते.
चतुःसीमा
राजकीय विभाग
राजकीय दृष्ट्या लेसोथो १० जिल्ह्यांमध्ये विभागला गेला आहे.
मोठी शहरे
समाजव्यवस्था
लेसोथोची लोकसंख्या अंदाजे २०.६७ लाख इतकी असून येथील २५ टक्के जनता शहरी तर ७५ टक्के ग्रामीण आहे.