इ.स. १९६० सालापर्यंत काँगो ही फ्रान्सची एक वसाहत होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँगोमध्ये लष्करी, कम्युनिस्ट, लोकशाही इत्यादी अनेक प्रकारच्या राजवटींचे प्रयोग झाले. सध्या येथे अध्यक्षीय सरकार असून १९९७ सालापासून डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो हा काँगोचा राष्ट्राध्यक्ष आहे. स्वातंत्र्यापासूनच आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेला काँगो यादवी, अराजकता, दोन राजकीय गटांमधील चकमकी इत्यादी कारणांस्तव आजही अशांत व अस्थिर आहे.
येथील अर्थव्यवस्था शेती व खनिज तेलावर अवलंबून असून खाणकाम हा देखील येथील प्रमुख उद्योग आहे.