फ्रेंच भाषा बोलली जाणारे प्रदेश.गडद निळा-फ्रेंच भाषिक, निळा-अधिकृत, फिकट निळा-सांस्कृतीक, हिरवा-अल्पसंख्यांक
फ्रेंच (Français) ही जगातील एक प्रमुख भाषा आहे. जगातील ५४ देशातील सुमारे ३० कोटी लोक (प्रथम व द्वितीय-प्रभुत्व) फ्रेंच बोलू शकतात.[५] प्राचिन लॅटिन भाषेपासून फ्रेंचची निर्मिती झाली असून. २९ देशांची ती अधिकृत राजभाषा आहे व इंग्लिश भाषा नंतर सर्वात जास्त शिकली जाणारी परदेशी भाषा आहे. ही भाषा इंग्लिश प्रमाणे रोमनबाराखडी वापरून लिहिली जाते.