ग्रीक भाषा

ग्रीक भाषा ही ग्रीस देशात बोलली जाणारी प्रमुख भाषा आहे. आधुनिक ग्रीकभाषेतील मधील गॅमा या अक्षराचा उच्चार हा इंग्लिशमधील जी या अक्षरासारखा नसून वाय सदृश असतो. अभिजात ग्रीक भाषेच्या अ‍ॅटिक बोलीत ह-सदृश स्वराचे अस्तित्त्व. वर्णापुढील एका टीम्बाने दर्शवले जात असे. क्लिओपात्राची राजधानी अलेक्झांड्रिया इथे होती. तिच्या दरबारात राज्यकारभार ग्रीक भाषेत चालत असे. ग्रीसच्या आर्केलाइस, जेरॉम इ. विद्वानांनी बुद्धाच्या जातक कथांचा ग्रीक भाषेत अनुवाद केला होता.ग्रीक

लिपी

ग्रीक लिपी तून इट्रुस्कन, लॅटिन, सिरिलिक या लिपी उत्पन्न झाल्या.

आधुनिक बदल

आधुनिक काळात सुटसुटीतपणासाठी ग्रीक भाषेमध्ये मध्ये असलेली अ‍ॅक्यूट-ग्रेव्ह-सर्कमफ्लेक्स ही त्रिस्तरीय पॉलिटोनिक पद्धती १९८२ साली बदलून त्याजागी एकच एक मोनोटोनिक पद्धती आणण्यात आली. संस्कृततील उदात्त-अनुदात्त-स्वरित सारखी ही पद्धती होती. परंतु वापरातील अडचणींमुळे ती कालबाह्य ठरत होती. ग्रीक भाषेत अनेक भारतीय शब्द सापडतात. इतकेच नव्हे तर ग्रीकांचा मुख्य देव झेउस आणि आपल्या ईंद्रात कमालीचे साधर्म्य आहे. वैदिक संस्कृत द्यु पासून ग्रीक भाषेत 'थिओ' हा शब्द आला त्यावरून 'थिऑलॉजी', 'थिऑसॉफी' म्हणजे देवाबद्दलच्या अभ्यासाची सुरुवात झाली.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!