ब्रुनेई दारुस्सलाम (अधिकृत नाव: मलाय:Negara Brunei Darussalam) हा आग्नेय आशियातीलबोर्निओ बेटाच्या उत्तर किनाऱ्यास वसलेला देश आहे. दक्षिण चिनी समुद्राकडेने असणाऱ्या समुद्रकिनारपट्टीखेरीज इअतर सर्व बाजूंनी हा देश मलेशियाच्यासारावाक राज्याने वेढलेला आहे. किंबहुना सारावाक राज्यामधील लिंबांग प्रदेशामुळे ब्रुनेई भूराजकीयदृष्ट्या दोन भागांमध्ये विभागला गेला आहे.
इतिहास
इ.स. ५१८ पासूनच ब्रुनाईचे चिनी व्यापाऱ्यांशी संबंध होते. ७ व्या ते १३ व्या शतकांच्या दरम्यान सुमात्राबेटाच्या श्रीविजय राजघराण्याची आणि जावा बेटातील मजापहित राजघराण्याची सत्ता ब्रुनाईवर होती. १५ व्या शतकात या राजघराण्यांचा अस्त झाला. ब्रुनाईचं मोठय़ा प्रमाणावर इस्लामीकरण होत गेलं, सुलतानशाही स्थापन झाली आणि युरोपिय सत्ता येईपर्यंत ती टिकून राहिली.
युरोपीय सत्ता
पोर्तुगीज, डच, स्पॅनिश येथे आले. त्यांनी केलेल्या आक्रमणांमुळे एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी सुलतानाची सत्ता सारायाक लगतच्या काही भागापुरतीच मर्यादित राहिली. इ.स. १८९८ ते इ.स. १९५९ या ६० वर्षांत सुलतानाचं स्थान दुय्यम बनले. इ.स. १९३१च्या सुमारास या डोंगराळ भूप्रदेशात खनिज तेल उत्पादनास सुरुवात झाली. पाठोपाठ दुसरे महायुद्ध झाले. या भूप्रदेशावर जपानने विजय मिळवला. युद्ध संपताच या भूप्रदेशावर ऑस्ट्रेलियाने ताबा घेतला. ब्रिटिश नागरी प्रशासनाची सुरुवात झाली. परंतु इ.स. १९५९च्या सुमारास पुन्हा सुलतानाचं निर्विवाद वर्चस्व इथे प्रस्थापित झाले.
सांप्रत स्थिती
४ जिल्हे आणि ३८ तालुके ही इथली प्रशासकीय रचना आहे.