मंगोलिया (मूळ उच्चार: माँगोल्या/मोंगोल्या) हा पूर्व व मध्य आशियातील एक देश आहे. मंगोलियाच्या उत्तरेला रशिया व इतर तिन्ही दिशांना चीन देश आहेत. उलानबातर ही मंगोलियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलिया हा जगातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेला स्वतंत्र देश आहे. येथील लोकसंख्या घनता केवळ १.७५ प्रति चौरस किमी इतकीच आहे.