जॉर्डन, अधिकृत नाव जॉर्डनाचे हाशेमी राजसत्ताक (किंवा जॉर्डनचे हाशेमाईट राज्य)(अरबी: المملكة الأردنية الهاشمية , अल् मामलका अल् उर्दुन्निया अल् हाशिमिया ;) हा पश्चिम आशियातील एक राजसत्ताक देश आहे. हा देश जॉर्डन नदीच्या पूर्व तीरावर वसला असून याच्या आग्नेयेस सौदी अरेबिया, पूर्वेस इराक, उत्तरेस सीरिया व पश्चिमेस मृत समुद्रावर सह-अधिकार असलेले इस्राएल व वेस्ट बँक हे देश आहेत. अम्मान ही जॉर्डनाची राजधानी आहे.
भूगोल
उन्हाळ्यात उष्ण असणाऱ्या या देशात हिवाळ्यात अम्मानसह व इतर काही डोंगराळ भागांत हिमवृष्टी होते.
इतिहास
या भागात आतापर्यंत मानवाच्या सर्वात जुन्या सांस्कृतिक जडणघडणीचे अवशेष सापडले आहेत आणि अजूनही सापडत आहेत. प्राचीन काळापासून या प्रदेशात आणि त्याच्या चारी बाजूला प्रबळ राज्ये-साम्राज्ये असल्याने महत्त्व होते. तसेच महत्त्वाचे व्यापारी मार्ग तेथून जात असल्याने या भागाला अनन्यसाधारण राजकीय आणि आर्थिक महत्त्व पूर्वी होते. इस पूर्वी चवथ्या शतकाच्या आसपास स्थापन झालेल्या नेबॅतियन राज्याचे अवशेष येथे पाहायला मिळतात. या नेबॅतियन राज्याचे पेत्रा दरी (पेत्रा व्हॅली) हे त्यापैकी सर्वात महत्त्वाचे आणि जगप्रसिद्ध ठिकाण आहे.
आधुनिक काळ
इ.स. १९४६ साली जॉर्डनला ब्रिटन नेपूर्ण स्वातंत्र्य जाहीर केले आणि पहिला राजा अब्दुल्ला आधुनिक जॉर्डनचा पहिला राजा बनला.
राजकिय
जॉर्डनमध्ये २००३ मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक होऊन लोकांनी निवडलेल्या संसदेची स्थापना झाली.
बाह्य दुवे
|
---|
| |
१ काही भाग युरोपात • २ काही भाग आफ्रिकेत • ३ काही भाग ओशानियामध्ये |