ऐतिहासिक काळापासून म्यानमारमधील वांशिक विविधता राजकारणावर व समाजगतिकीवर प्रभाव टाकत आली आहे.म्यानमारमध्ये पूर्वी राजेशाही होती. इंग्रजांनी म्यानमारच्या थिबा राजाचा पराभव करून म्यानमार बळकावला/जिंकला आणि थिबाला कैद करून भारतात रत्नागिरीत आणून ठेवले.४ जानेवारी इ.स.१९४८ रोजी म्यानमारला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले. नंतर आधुनिक काळातदेखील या देशाच्या राजकीय पटलावर वांशिक तणावांची पडछाया पडल्याचे दिसून येते. इ.स. १९९२ सालापासून म्यानमारची शासनव्यवस्था जनरल थान श्वे यांच्या नेतृत्वाखालील लष्करप्रणीत आघाडी सरकाराच्या नियंत्रणात आहे.
भारता मधून पासपोर्ट शिवाय भारतीय नागरिकाला भारता बाहेर जाता येते असे जे थोडे देश आहेत त्यापैकी एक म्हणजे बर्मा म्हणजेच ब्रम्हदेश म्हणजेच म्यानमार! सीमेवरून त्या देशात चक्क चालत जात येते. भारतातल्या मणिपूर राज्याला या देशाची सीमा लागलेली आहे. मणिपूर राज्याची राजधानी इंफाळ या गावा पासून रस्त्याने ३ तास प्रवास केला १०७ किलोमीटर अंतर गेले की मोरेह गाव लागते. हे भारतातले शेवटचे गाव आहे. तिथे सीमा ओलांडून आपण बर्मी नाम फा लॉंग बाजार या ठिकाणी पोचतो. या दोन ठिकाणांना जोडणारा एक छोटासा रस्ता आहे आणि त्यात दोन कमानिंच्या मध्ये एक टोल बूथ उर्फ चौकी आहे. तिथे भारतीय असल्याचे कुठलेही ओळखपत्र दाखवले की सीमा ओलांडता येते व तुम्ही म्यानमार मध्ये प्रवेश करू शकता!
या सीमेवर इमिग्रेशनचा अधिकारी नेमलेला आहे. माणशी 20 रु. जमा केले की इमिग्रेशनची पावती मिळते. या पावतीवर सकाळ पासून संध्याकाळपर्यंत बर्माच्या भागात थांबता येउ शकते. भारत व बर्मा या दोन देशांमधली सीमा सकाळी ६.३० ते संध्याकाळी ४.३० या वेळात चालत ओलांडायला खुली असते. त्यानंतर मात्र ही सीमा ओलांडता येत नाही.
इंफाळ या भारतातल्या त्यातल्या त्यात मोठ्ठ्या बाजार पेठेच्या तुलनेने इकडच्या वस्तू बऱ्यापैकी स्वस्त आहेत म्हणून भारतातले अनेक जण अगदी छोटे व्यापारी सुद्धा चौकीपलीकडच्या मार्केट मध्ये जाऊन भरपूर खरेदी करतात (electronics मात्र नाही) आणि चालत परत येतात. इथे सीमेपर्यंत येताना आणि जाताना निदान चार वेळा तरी भारतीय सैन्यात कडून थांबवले जाते. एकदा प्रत्येकाचे ओळखपत्र तपासले जाते. निदान एकदा तरी सगळ्यांना उतरवून गाडीची तपासणी होते.