दक्षिण आशिया हा आशिया खंडामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. ह्या प्रदेशामध्ये भारतीय उपखंडामधील भूभागाचा समावेश होतो. भौगोलिक दृष्ट्या दक्षिण आशिया हिमालयाच्या व हिंदुकुश पर्वतरांगे दक्षिणेकडील भारतीय प्रस्तरावर स्थित असून त्याच्या दक्षिणेस हिंदी महासागर आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश व श्रीलंका हे भारतीय उपखंडामधील प्रमुख देश तसेच, नेपाळ, अफगाणिस्तान, भूतान व मालदीव ह्या आठ देशांना साधारणपणे दक्षिण आशियाई देश मानले जाते.
१९८५ साली दक्षिण आशियाई देशांनी प्रादेशिक राजकीय व वाणिज्य संबंध बळकट करण्यासाठी सार्कची स्थापना केली व २००४ साली दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराला मान्यता दिली.
बाह्य दुवे
|
---|
| |
१ काही भाग युरोपात • २ काही भाग आफ्रिकेत • ३ काही भाग ओशानियामध्ये |