सुमारे १८ लाख क्षेत्रफळ असलेला लिबिया हा आफ्रिकेतील चौथा मोठा तर जगातील १७व्या क्रमांकाचा देश आहे व येथील लोकसंख्या अंदाजे ६४.२ लाख आहे.[४] ह्यापैकी बहुसंख्य लोक देशाच्या उत्तर भागात भूमध्य समुद्रकिनाऱ्याजवळ वसले आहेत तर सहारा वाळवंट असलेल्या दक्षिण भागात अत्यंत तुरळक वस्ती आहे. लिबियातील बहुतांशी जनता अरब वंशाची आहे
मोठ्या प्रमाणावर असलेल्या खनिज तेलाच्या साठ्यांमुळे हा देश आर्थिक दृष्ट्या बळकट आहे. लिबियाची अर्थव्यवस्था आफ्रिका खंडामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे तर मानवी विकास निर्देशांकाच्या बाबतीत लिबिया आफ्रिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.[५][६]
सोळाव्या शतकापासून ते विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत लिबियावर ओस्मानी साम्राज्याची सत्ता होती तर १९११ ते १९५१ दरम्यान लिबिया ही इटली देशाची एक वसाहत होती. १९६९ सालापासून मुअम्मर अल-गद्दाफी हा इसवी सन २०११ पर्यंत लिबियाचा राष्ट्रप्रमुख व सर्वेसर्वा होता.
इतिहास
इसवी सनाच्या आधीपासून हा भाग रोमन साम्राज्याच्या अंतर्गत येत होता. अजूनही ४-५ ठिकाणी रोमन अवशेष आढळतात. लेप्तिस माग्ना, त्रिपोली आणि साब्राथा अशा तीन शहरांनी मिळून त्रिरिपोलिताना हा प्रांत बनला होता. अजूनही त्रिपोली टिकून आहे पण बाकी दोन शहरांचे फक्त अवशेष पाहायला मिळतात. साब्राथा येथील अवशेष जागतिक ठेवा म्हणून घोषित झालेले आहेत. साब्राथामध्ये इसवी सन पूर्वी ५-६व्या शतकात फिनीशियन लोकांनी राहण्यास सुरुवात केली. उत्तर आफ्रिकेमधली एक मोठी बाजारपेठ म्हणून साब्राथाचे नाव होते. इसवी सनापूर्वी दीडशे वर्षे, रोमन साम्राज्याचा भाग बनलेल्या साब्राथाने हस्तिदंताची, गुलामांची आणि आफ्रिकेच्या जंगलातल्या प्राण्याची निर्यात केली आणि धान्याची आयात केली. या शहराला स्वतःची नाणी बनवण्याची परवानगी होती.
^Department of Economic and Social Affairs
Population Division (2009). "World Population Prospects, Table A.1"(PDF). 2008 revision. United Nations. 2009-03-12 रोजी पाहिले. line feed character in |author= at position 42 (सहाय्य); Cite journal requires |journal= (सहाय्य)
^"Libya". International Monetary Fund. 2010-04-21 रोजी पाहिले.