फिजीचे प्रजासत्ताक (इंग्लिश: Republic of Fiji; फिजीयन: Matanitu ko Viti; फिजी हिंदी: फ़िजी गणराज्य) हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक द्वीप-देश आहे. हा देश सुमारे ३३२ बेटे असलेल्या द्वीपसमूहाचा बनला असून ह्यांपैकी ११० बेटांवर लोकवस्ती आहे. व्हिटी लेवू व व्हानुआ लेवू ही येथील प्रमुख बेटे आहेत. फिजीची राजधानी सुवा व्हिटी लेवू बेटावरच वसली आहे व ७५ टक्के रहिवासी सुवा महानगर परिसरामध्ये वास्तव्यास आहेत.
फिजी हा ओशनिया खंडामधील सर्वात विकसित देशांपैकी एक मानला जातो. २०१२ साली फिजीची लोकसंख्या ८.६८ लाख होती ज्यापैकी ३८ टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत. येथील राजकारण, समाजजीवन इत्यादींवर भारतीय संस्कृतीचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे.
इतिहास
फिजीमध्ये इ.स. पूर्व ३५०० ते इ.स. पूर्व १००० दरम्यानच्या काळापासून लोकजीवन असल्याचे पुरावे मिळाले आहेत. येथे असलेल्या अनेक नरभक्षक अदिवासी जमातींमुळे युरोपीय शोधक फिजीला Cannibal Isles असे संबोधत असत. आबेल टास्मान नावाच्या डच संशोधकाला इ.स.१६४३ फिजीचा शोध सर्वप्रथम लागला. १९व्या शतकामध्ये येथे ब्रिटिश साम्राज्याची सत्ता प्रस्थापित झाली. ब्रिटिशांनी भारतामधून अनेक मजूरांना येथील शेतींवर काम करण्यसाठी स्तलांतरित केले. १९४२ साली फिजीची लोकसंख्या २.१ लाख होती ज्यांपैकी ९४ हजार भारतीय होते. १९७० साली फिजीला स्वातंत्र्य मिळाले. २००६ साली येथील भ्रष्ट सरकारविरुद्ध लष्कराने बंड करून सरकार उलथवून लावले. फ्रँक बैनिमारामा हा लष्करी पुढारी फिजीचा विद्यमान पंतप्रधान आहे. ह्या अवैध लष्करी सत्ता बळकावण्यामुळे फिजीला २००९ साली राष्ट्रकुल परिषदेमधून निलंबित करण्यात आले.
नावाची व्युत्पत्ती
प्रागैतिहासिक कालखंड
भूगोल
फिजी देश १,९४,००० चौ. किमी (७५,००० चौ. मैल) इतक्या क्षेत्रफळावर स्थित असून ह्यापैकी केवळ १० टक्के जमीन आहे.
चतुःसीमा
राजकीय विभाग
मोठी शहरे
समाजव्यवस्था
वस्तीविभागणी
धर्म
शिक्षण
संस्कृती
राजकारण
अर्थतंत्र
खेळ
बाह्य दुवे