कूक द्वीपसमूह हा ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील अनेक बेटांवर वसलेला एक देश आहे. रारोटोंगा हे कूक बेटांपैकी सर्वात मोठे व सर्वाधिक लोकसंख्येचे बेट आहे. अव्हारुआ ही कूक द्वीपसमूहाची राजधानी याच बेटावर आहे.
कूक द्वीपसमूह व न्युए ह्या दोन देशांचे न्यू झीलंडशी मुक्त संबंध (फ्री असोसिएशन) आहेत.