१९४० उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची बारावी आवृत्ती जपान देशाच्या टोक्यो शहरात खेळवली जाणार होती. ऐनवेळी जपानने ऑलिंपिक स्पर्धांमधून अंग काढून घेतल्यामुळे ही स्पर्धा फिनलंडच्याहेलसिंकीमध्ये हलवण्यात आली. परंतु दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर ही स्पर्धा रद्द करण्यात आली.