१९४८ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची चौदावी आवृत्ती इंग्लंड देशाच्या लंडन शहरामध्ये जुलै २९ ते ऑगस्ट १४ दरम्यान खेळवली गेली. दुसरे महायुद्ध घडल्यामुळे १९३६ नंतर प्रथमच ऑलिंपिक स्पर्धा खेळवल्या गेल्या. ह्या स्पर्धेमध्ये ५९ देशांच्या ४,१०४ खेळाडूंनी भाग घेतला.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या प्रचंड आर्थिक हानीमुळे ह्या स्पर्धेसाठी कोणत्याही नव्या वास्तू बांधल्या गेल्या नव्हत्या.
सहभागी देश
खालील ५९ देशांनी ह्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. एकूण १४ देशांची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये पराभूत झालेल्या जर्मनी व जपानना आमंत्रण देण्यात आले नव्हते तर सोव्हिएत संघाने आपले खेळाडू पाठवले नाहीत. स्वतंत्रभारताची ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.