१९६० हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची आठवी आवृत्ती होती. ही स्पर्धा अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या लेक टाहो येथील स्क्वा व्हॅली ह्या एका स्की रिझॉर्टमध्ये १४ ते फेब्रुवारी २८ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३० देशांच्या ६६५ खेळाडूंनी सहभाग घेतला.
यजमान शहर
ह्या स्पर्धेसाठी सियेरा नेव्हाडा पर्वतरांगेमधील स्क्वा व्हॅली ह्या स्की रिझॉर्ट निवड १९५५ साली करण्यात आली. ऑस्ट्रियामधील इन्सब्रुक, पश्चिम जर्मनीमधील गार्मिश-पाटेनकर्शन तसेच स्वित्झर्लंडमधील सेंट मॉरिट्झ ही शहरे देखील यजमानपदासाठी उत्सुक होती.
सहभागी देश
खालील ३० देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. पूर्व व पश्चिम जर्मनी देशांनी ह्या स्पर्धेत एकत्रित संघाद्वारे भाग घेतला.
खेळ
खालील आठ खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.
पदक तक्ता
बाह्य दुवे