ह्या स्पर्धेसाठी रशियामधील काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर संपूर्णपणे नवीन क्रीडा संकूल बांधले गेले आहे. ह्या स्पर्धेसाठी पायाभूत सुविधा (रेल्वे, महामार्ग, विमानतळ) सुधारण्यासाठी तसेच अनेक सोयी नव्याने बांधण्यासाठी एकूण ५१ अब्ज अमेरिकन डॉलर इतका खर्च आला आहे. सोत्शी २०१४ ही आजवरच्या इतिहासामधील सर्वात खर्चिक क्रीडा स्पर्धा आहे.
खेळ
२०१४ ऑलिंपिक स्पर्धेमध्ये खालील १५ हिवाळी खेळांचे आयोजन केले जात आहे. प्रत्येक खेळापुढील कंसांत त्या खेळाचे प्रकार दर्शवले आहेत.
aभारतीय ऑलिंपिक संघाला डिसेंबर २०१२ पासून निलंबित केले गेले असल्यामुळे भारत देशाचे उत्सुक खेळाडू ऑलिंपिक ध्वज वापरून वैयक्तिकपणे ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.[१] ११ फेब्रुवारी रोजी आय.ओ.ए.चे निलंबन मागे घेतले गेले व भारतीय खेळाडूंना भारताचा ध्वज वापरण्यास परवानगी देण्यात आली.[२]