१९०६ उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील एक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा आहे. ही स्पर्धा ग्रीस देशाच्या अथेन्स शहरामध्ये २२ एप्रिल ते २ मे दरम्यान खेळवली गेली. ही स्पर्धा आय.ओ.सी.च्या चार वर्षांच्या वेळापत्रकाप्रमाणे नव्हती. त्यामुळे त्या वेळी जरी ही ऑलिंपिक स्पर्धा मानली गेली असली तरी सध्या येथे मिळालेल्या पदकांना आय.ओ.सी.च्या लेखी वैध दर्जा नाही व ही पदके आय.ओ.सी.च्या लोझानमधील संग्रहालयात ठेवली गेलेली नाहीत.