लोझान ही स्वित्झर्लंड देशाच्या व्हो प्रदेशाची राजधानी व स्वित्झर्लंडमधील पाचव्या क्रमांकाचे शहर आहे. लोझान शहर स्वित्झर्लंडच्या पश्चिमेकडील फ्रेंच-भाषिक भागात जिनिव्हा सरोवराच्या काठावर वसले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे मुख्यालय ह्याच शहरात आहे.