समुद्रसपाटी म्हणजेच समुद्राच्या पाण्याची सरासरी सपाटी.याचा वापर जमीनीची उंची ठरविण्यासाठी प्रमाण म्हणुन करतात.
जमिनीची उंची मोजण्यासाठी ठरविण्यात आलेली "समुद्राची आधारभुत सरासरी पातळी"(mean sea level)(सरासरी समुद्र पातळी). यास (00.00) असे समजुन मग त्यानुसार एकाद्या जागेची/पर्वताची/स्थानाची वगैरे उंची त्यावरून ठरवितात. ती उंची यापेक्षा जास्त असल्यास 'समुद्र सपाटीपेक्षा वर' आणि खाली असल्यास 'समुद्र सपाटीपेक्षा खाली' असे नोंदविण्याचा प्रघात आहे. बहुतेक रेल्वे स्थानकांवरील नावांच्या पाट्यांवर पूर्वी ही समुद्र सपाटी नोंदविण्याचा प्रघात होता. स्थापत्य अभियांत्रिकी मधील बहुतेक प्राथमिक कामे याचे भरवश्यावरच होतात.