१९३६ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची अकरावी आवृत्ती होती. ही स्पर्धा जर्मनी देशाच्या बर्लिन शहरामध्ये ऑगस्ट १ ते ऑगस्ट १४ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये ४९ देशांमधील ३,९६३ खेळाडूंनी भाग घेतला.
नाझी जर्मनीमध्ये हिटलरच्या नेत्र्त्वाखाली सत्तेवर असलेल्या नाझी पक्षाने ह्या स्पर्धेत आर्यनेतर वर्णाच्या खेळाडूंना जर्मनीतर्फे खेळण्यास मज्जाव केला होता. नाझी पक्षाच्या ह्या व इतर अनेक उघड ज्यूविरोधी धोरणांमुळे अनेक देशांनी ह्या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा विचार केला होता. अनेक देशांच्या ज्यू खेळाडूंनी येथे भाग घेण्यास नकार दिला होता. खेळाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह ब्रॉडकास्ट) करणारी ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.