१९६४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची नववी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑस्ट्रिया देशाच्या इन्सब्रुक शहरामध्ये जानेवारी २९ ते फेब्रुवारी ९ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३६ देशांच्या १,०९१ खेळाडूंनी सहभाग घेतला.
यजमान शहर
इन्सब्रुकचे ऑस्ट्रियामधील स्थान
ह्या स्पर्धेसाठी आल्प्स पर्वतरांगेमधील इन्सब्रुक शहराची निवड १९५५ साली करण्यात आली. कॅनडामधील कॅल्गारी तसेच फिनलंडमधील लाह्टी ही शहरे देखील यजमानपदासाठी उत्सुक होती.
सहभागी देश
खालील ३६ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. भारताची ही पहिलीच हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा होती. पूर्व व पश्चिम जर्मनी देशांनी ह्या स्पर्धेत एकत्रित संघाद्वारे भाग घेतला.
खेळ
खालील आठ खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.
पदक तक्ता
बाह्य दुवे