१९८४ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची तेविसावी आवृत्ती अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या लॉस एंजेल्स शहरामध्ये जुलै १९ ते ऑगस्ट ३ दरम्यान खेळवली गेली. इ.स. १९०४ नंतर अमेरिकेने प्रथमच उन्हाळी स्पर्धांचे आयोजन केले.
अमेरिकेची संयुक्त संस्थाने व सहकारी देशांनी टाकलेल्या १९८० मॉस्को ऑलिंपिक स्पर्धेवरील बहिष्काराचा वचपा म्हणून सोव्हिएत संघ व इतर १३ कम्युनिस्ट देश ह्या स्पर्धेत सहभागी झाले नाहीत.
सहभागी देश
ह्या स्पर्धेत एकूण १४० देशांनी सहभाग घेतला ज्यांपैकी ६ देशांची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती.
बहिष्कार
खालील १४ देशांनी ह्या स्पर्धेवर बहिष्कार टाकला होता.
इराण व लिबिया ह्या देशांनी देखील ह्या स्पर्धेत भाग घेतला नाही.
पदक तक्ता
बाह्य दुवे