१९३२ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची दहावी आवृत्ती होती. ही स्पर्धा अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या लॉस एंजेल्स शहरामध्ये जुलै ३० ते ऑगस्ट १४ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये ३७ देशांमधील सुमारे १,३३२ खेळाडूंनी भाग घेतला. १९३० च्या सुमारास आलेल्या जागतिक महान मंदीमुळे अनेक राष्ट्रांनी कमी खेळाडू ह्या स्पर्धेला पाठवणे पसंद केले.