१९०० उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील दुसरी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा होती. ही स्पर्धा फ्रान्स देशाच्या पॅरिस शहरामध्ये १४ मे ते २८ ऑक्टोबर दरम्यान खेळवली गेली. ह्या प्रदीर्घ स्पर्धेमध्ये २४ देशांच्या सुमारे १,००० खेळाडूंनी भाग घेतला. महिलांचा सहभाग असलेली ही पहिलीच जागतिक स्पर्धा होती.