ऑलिंपिक हा क्रीडा प्रकारांचे आयोजन असलेला जागतिक स्पर्धात्मक उपक्रम आहे.[१]या संकल्पनेचा उगम ग्रीस या देशात झाला आहे.
इतिहास
ग्रीस या देशात क्रीडा प्रकारांना विशेष महत्व दिले जाते.इसवी सन पूर्व आठव्या शतकात ग्रीसमध्ये या खेळांची सुरुवात झाली असा याचा इतिहास आहे. दर चार वर्षांनी तेथे होणाऱ्या स्पर्धेत विविध खेळाडू सहभाग घेत असत.[२]
खेळांचा इतिहास (ग्रीसमधील) ३००० वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरुवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली.ग्रीस, जर्मनी, फ़्रान्स, इंग्लंड ,भारत सह १४ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सामिल झाले होते. ६ एप्रिल १८९६ रोजी अमेरिकन खेळाडू जेम्स कोन्नोली याने पहिले ऑलिंपिक पदक जिंकले.
ध्वज
या स्पर्धेचे वैशिष्ट्य सांगणारे पाच वर्तुळे एकमेकात गुंतलेले असे प्रतीक आहे. यामध्ये आशिया, आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोप या देशांचा समावेश दाखविणारी ही पाच वर्तुळे आहेत.निळा, पिवळा, काळा, हिरवा आणि लाल रंगांची ही वर्तुळे विविध देशांचे प्रतिनिधित्व करतात असे मानले जाते.[३]