सिडनी

सिडनी
Sydney
ऑस्ट्रेलियामधील शहर


सिडनी is located in ऑस्ट्रेलिया
सिडनी
सिडनी
सिडनीचे ऑस्ट्रेलियामधील स्थान

गुणक: 33°51′35.9″S 151°12′40″E / 33.859972°S 151.21111°E / -33.859972; 151.21111

देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राज्य न्यू साउथ वेल्स
स्थापना वर्ष २६ जानेवारी १७८८
क्षेत्रफळ १२,१४५ चौ. किमी (४,६८९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४६,२७,३४५
  - घनता २,०५८ /चौ. किमी (५,३३० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १०:००
http://www.cityofsydney.nsw.gov.au


सिडनी हे ऑस्ट्रेलिया देशामधील सगळ्यात मोठे शहर व आर्थिक राजधानी आहे. तसेच हे शहर न्यू साउथ वेल्स ह्या राज्याची राजधानी देखील आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात टास्मान समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या सिडनीची लोकसंख्या ४६ लाखांहून अधिक आहे.

सिडनी शहराची स्थापना जानेवारी २६, इ.स. १७८८ रोजी आर्थर फिलिपने केली. सुरुवातीला हे शहर म्हणजे ब्रिटिश कैद्यांची वस्ती होते. सध्या ऑपेरा हाउससिडनी हार्बर ब्रिज ही जगप्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे असणारे सिडनी हे एक आघाडीचे जागतिक शहर आहे. येथील सिडनी क्रिकेट मैदान प्रसिद्ध आहे. सिडनी २६व्या ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते.

सिडनी बंदर पूल


वाहतूक

सिडनी विमानतळ हा सिडनीमधील प्रमुख विमानतळ असून क्वांटासचे मुख्यालय येथेच स्थित आहे.

खेळ

स्टेडियम ऑस्ट्रेलियासिडनी क्रिकेट मैदान ही सिडनीमधील प्रमुख स्टेडियम आहेत. न्यू साउथ वेल्स ब्ल्यूज हा शेफील्ड शील्डमध्ये खेळणारा संघ तर सिडनी सिक्सर्ससिडनी थंडर हे बिग बॅश लीगमध्ये खेळणारे क्रिकेट संघ सिडनीमध्ये स्थित आहेत. ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल रग्बी लीगमधील १६ पैकी ९ संघ सिडनीमध्येच आहेत.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!