१९८८ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची चोविसावी आवृत्ती दक्षिण कोरिया देशाच्या सोल शहरामध्ये सप्टेंबर १७ ते ऑक्टोबर २ दरम्यान खेळवली गेली. इ.स. १९६४ नंतर प्रथमच ही स्पर्धा आशिया खंडात आयोजित केली गेली.
सहभागी देश
उत्तर कोरिया व त्याचे सहकारी आल्बेनिया, मादागास्कर, क्युबा व सेशेल्स ह्यांनी ह्या स्पर्धेवर बहिष्कार टाकला. तसेच इतर कारणांवरून निकाराग्वा व इथियोपिया ह्यांनी देखील भाग घेतला नाही. तरीही ही स्पर्धा ऑलिंपिकच्या इतिहासात सर्वाधिक सहभाग असलेली ठरली.
पदक तक्ता
बाह्य दुवे