दुसऱ्या महायुद्धामुळे युरोप व इतरत्र देशांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्यामुळे ह्या स्पर्धेच्या आयोजनात अनेक आर्थिक अडचणी आल्या. तसेच सहभागी होणाऱ्या खेळाडूंकडे पुरेशी साधने नव्हती.
यजमान शहर
सेंट मॉरिट्झ
सेंट मॉरिट्झचे स्वित्झर्लंडमधील स्थान
ह्या स्पर्धेसाठी आल्प्स पर्वतामधील सेंट मॉरिट्झ ह्या शहराची निवड सप्टेंबर १९४६ मध्ये करण्यात आली. अमेरिकेमधीललेक प्लॅसिड हे शहरे देखील यजमानपदासाठी उत्सुक होते परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर एका तटस्थ देशामध्येच ही स्पर्धा घेण्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने ठरवले.