१९६८ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची दहावी आवृत्ती होती. ही स्पर्धा फ्रान्स देशाच्या ग्रेनोबल शहरामध्ये जानेवारी २९ ते फेब्रुवारी ९ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३७ देशांच्या १,१५८ खेळाडूंनी सहभाग घेतला.
यजमान शहर
ग्रेनोबलचे फ्रान्समधील स्थान
ह्या स्पर्धेसाठी आल्प्स पर्वतरांगेमधील ग्रेनोबल शहराची निवड १९६४ साली करण्यात आली. कॅनडामधील कॅल्गारी, फिनलंडमधील लाह्टी, जपानमधील सप्पोरो, अमेरिकेमधील लेक प्लॅसिड व नॉर्वेमधील ओस्लो ही शहरे देखील यजमानपदासाठी उत्सुक होती.
सहभागी देश
खालील ३७ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. पूर्व व पश्चिम जर्मनी देशांनी ह्या स्पर्धेत प्रथमच वेगवेगळा भाग घेतला.
खेळ
खालील दहा खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.
पदक तक्ता
बाह्य दुवे