नेदरलँड्स ॲंटिल्स (डच: Nederlandse Antillen; पापियामेंतो: Antia Hulandes) हा कॅरिबियनच्या लेसर ॲंटिल्स भागामधील नेदरलँड्सच्या राजतंत्राचा एक भूतपूर्व देश आहे. पूर्वी हा प्रदेश नेदरलँड्स वेस्ट इंडीज ह्या नावाने ओळखला जात असे.
१९५४ साली स्थापन केल्या गेलेल्या ह्या स्वायत्त देशाची २०१० साली बरखास्ती करून त्याचे चार भाग करण्यात आले. अरूबा हा देश १९८६ सालीच नेदरलँड्स ॲंटिल्समधून वेगळा झाला होता. १० ऑक्टोबर २०१० रोजी कुरसावो व सिंट मार्टेन हे डच राजतंत्रामधील स्वतंत्र देश बनले तर नेदरलँड्स ॲंटिल्सचा उर्वरित भागाला नेदरलँड्समधील विशेष नगरपालिका बनवण्यात आले.
विघटन
संदर्भ
बाह्य दुवे