फेब्रुवारी २८
फेब्रुवारी २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५९ वा किंवा लीप वर्षात ५९ वा दिवस असतो.
ठळक घटना
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १८७३ - सर जॉन सायमन, सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष
- १८९७ - डॉ. शंकर दामोदर पेंडसे, मराठी लेखक.
- १९०१ - लिनस कार्ल पॉलिंग, रसायनशास्त्रज्ञ.
- १९१३ - पंडित नरेंद्र शर्मा, हिंदी साहित्यिक
- १९२६ - स्वेतलाना अलिलुयेवा, जोसेफ स्टालिनची मुलगी.
- १९२७ - कृष्णकांत, भारताचे १०वे उपराष्ट्रपती.
- १९२९ - रंगास्वामी श्रीनिवासन, भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञ.
- १९३५ - क्लाइव्ह हाल्से, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९४४ - रविंद्र जैन, हिंदी गीतकार आणि संगीतकार.
- १९४६ - ग्रॅहाम व्हिवियन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४७ - दिग्विजय सिंघ, भारतातील मध्यप्रदेश राज्याचे पूर्व मुख्यमंत्री आणि भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे नेते.
- १९४७ - विजय बहुगुणा, भारतातील उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री.
- १९५१ - करसन घावरी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - यू. श्रीनिवास, मेंडोलिन वादक, सप्टेंबर १३ २००३ रोजी त्यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर झाला.
- १९७१ - परमजीत सिंघ, भारतीय खेळाडू, यांनी ४०० मीटर शर्यतीचा ३८ वर्षांचा मिल्खा सिंघचा राष्ट्रीय रेकॉर्ड मोडला.
- १९७५ - अझहर महमूद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७८ - राणा नवेद-उल-हसन, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७८ - यासिर हमीद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १५२५ - क्वाह्टेमॉक, ऍझटेक सम्राट.
- १५७२ - राणा उदयसिंह, मेवाडचे शासक आणि महाराणा प्रताप यांचे वडील.
- १६४८ - क्रिस्चियन चौथा, डेन्मार्कचा राजा.
- १८६९ - आल्फोन्स द लामार्टीन, फ्रेंच कवी, लेखक, राजकारणी.
- १९२५ - फ्रिडरिश एबर्ट, जर्मनीचा चान्सेलर.
- १९२६ - गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद, मराठी शाहीर.
- १९३६ - कमला नेहरू, जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी.
- १९४१ - आल्फोन्सो तेरावा, स्पेनचा राजा.
- १९६३ - डॉ. राजेंद्र प्रसाद, भारताचे प्रथम राष्ट्रपती.
- १९६६ - उदयशंकर भट्ट, हिंदी साहित्यिक
- १९७९ - पाउल आल्वेर्डेस, जर्मन कवी, लेखक.
- १९८६ - ओलोफ पाल्मे, स्वीडनचा पंतप्रधान.
- १९९८ - राजा गोसावी, मराठी चित्रपट अभिनेता.
- १९९९ - भगवंतराव श्रीपतराव पंतप्रतिनिधी, औंध संस्थानचे राजे.
- २००३ - फिदेल सांचेझ हर्नान्देझ, एल साल्वादोरचा राष्ट्राध्यक्ष.
- २००६ - ओवेन चेंबरलेन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
फेब्रुवारी २६ - फेब्रुवारी २७ - फेब्रुवारी २८ - फेब्रुवारी २९ - मार्च १ - (फेब्रुवारी महिना)
|
|