जानेवारी ५
जानेवारी ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५ वा किंवा लीप वर्षात ५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
पंधरावे शतक
सतरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १५८७ - झु झियाके, चीनी लेखक व शोधक.
- १५९२ - शहाजहान, भारतातील मोगल सम्राट.
- १७७९ - झेब्युलोन पाईक, अमेरिकन शोधक.
- १८४६ - रुडॉल्फ क्रिस्टॉफ युकेन, जर्मन लेखक, नोबेल पारितोषिक विजेता.
- १८५५ - किंग कॅम्प जिलेट, अमेरिकन शोधक.सेफ्टी रेझर तयार करून प्रथम बाजारात आणणारा.
- १८६८ - गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू, मराठी संतकवी.
- १८६९ - वेंकटेश तिरको कुलकर्णी, कन्नड साहित्यिक .
- १८८३ - खलील जिब्रान, अरब कवी, तत्त्वज्ञानी व चित्रकार.
- १८९२ - कृ.पां. कुळकर्णी मराठी भाषेचे अभ्यासक.
- १८९३ - परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.
- १९१३ - श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक.
- १९२० - मोहम्मद अस्लम, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९२२ - मोहम्मद उमर मुक्री, हिंदी विनोदी चरित्र अभिनेता.
- १९२५ - रमेश मंत्री, मराठी साहित्यिक .
- १९२८ - विजय तेंडुलकर, मराठी साहित्यिक .
- १९२८ - झुल्फिकार अली भुट्टो, पाकिस्तानी अध्यक्ष, पंतप्रधान.
- १९२८ - वॉल्टर मॉन्डेल, अमेरिकन राजकारणी.
- १९२८ - इम्तियाझ अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९३८ - पहिला हुआन कार्लोस स्पेनचा राजा.
- १९४१ - मन्सूर अली खान पतौडी, भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, पतौडी संस्थानाचा नववा व अखेरचा नवाब.
- १९४१ - बॉब क्युनिस, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४८ - पार्थसारथी शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४८ - फैय्याज अभिनेत्री व गायिका.
- १९५१ - एझ्रा मोझली, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.
- १९५५ - ममता बॅनर्जी, बंगाली नेत्या.
- १९६१ - ना. धों. ताम्हणकर कथालेखक, कादंबरीकार व बाल साहित्यकार.
- १९६२ - ब्रॅंन्डन कुरुप्पु, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७७ - जमालुद्दीन अहमद, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - मार्लोन सॅम्युएल्स, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.
- १९८६ - दीपिका पदुकोण – कन्नड, हिंदी आणि तामिळ चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू
- ८४२ - अल मुतासिम, अब्बासी खलिफा.
- १५८९ - मेदिचीची कॅथेरीन, फ्रान्सचा राजा हेन्री दुसरा याची पत्नी.
- १६५५ - पोप इनोसंट दहावा.
- १७६२ - रशियाची एलिझाबेथ, रशियाची साम्राज्ञी.
- १८४७ - त्यागराज, कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ व गायक.
- १९३३ - कॅल्विन कूलिज, अमेरिकेचा २९वा अध्यक्ष.
- १९४३ - जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, अमेरिकन शिक्षणतज्ञ, वनस्पतिशास्त्रज्ञ.
- १९८२ - रामचंद्र चितळकर उर्फ सी.रामचंद्र, भारतीय संगीतकार.
- १९८४ - सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, वेदशास्त्र अभ्यासक, चरित्रकोशकार.
- १९९० - रमेश बहल, चित्रपट निर्माता व दिग्दर्शक.
- १९९२ - द.ग. गोडसे, मराठी समीक्षक , नाटककार, इतिहासकार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार
- २००३ - गोपालदास पानसे, पखवाजवादक.
प्रतिवार्षिक पालन
संदर्भ
जानेवारी ३ - जानेवारी ४ - जानेवारी ५ - जानेवारी ६ - जानेवारी ७ - (जानेवारी महिना)
बाह्य दुवे
|
|