एप्रिल १७
एप्रिल १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०७ वा किंवा लीप वर्षात १०८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
पहिले शतक
पंधरावे शतक
सोळावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- ५९३ - जोमेइ, जपानी सम्राट.
- १४७८ - संत सूरदास, हिंदी कवी, कृष्णभक्त.
- १७३४ - तक्सिन, थायलंडचा राजा.
- १७५६ - धीरन चिन्नामलाई, तमिळ क्रांतिकारी.
- १८९१ - यशवंत रामकृष्ण दाते, कोशकार.
- १८९४ - निकिता ख्रुश्चेव्ह, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१६ - सिरीमाओ बंदरनायके , श्रीलंकेच्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान.
- १९२७ - चंद्रशेखर, भारताचे पंतप्रधान.
- १९५१ - बिंदू, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९६१ - गीत सेठी, भारतीय बिलियर्ड्स खेळाडू.
- १९७२ - मुथिया मुरलीधरन, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - व्हिक्टोरिया बेकहाम, इंग्लिश गायिका.
- १९७७ - दिनेश मोंगिया, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १०८० - हॅराल्ड तिसरा, डेन्मार्कचा राजा.
- १७११ - जोसेफ पहिला, पवित्र रोमन सम्राट.
- १७९० - बेंजामिन फ्रॅंकलिन, अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी.
- १८८२ - जॉर्ज जेनिंग्स, फ्लश टॉयलेटचे शोधक.
- १८९१ - अलेक्झांडर मॅकेन्झी, कॅनडाचा पंतप्रधान.
- १९३६ - चार्ल्स रुईस डि बीरेनब्रुक, नेदरलॅंड्सचा पंतप्रधान.
- १९४४ - जे.टी. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - व्ही.एस. श्रीनिवासशास्त्री, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष.
- १९७५ - सर्वपल्ली राधाकृष्णन, भारतीय राष्ट्राध्यक्ष.
- १९९० - दिनकर गंगाधर केळकर, राजा केळकर संग्रहालयाचे संचालक.
- १९९७ - बिजू पटनायक, ओरिसाचे मुख्यमंत्री, केंद्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री.
- १९९८ - विजय सिप्पी, हिंदी चित्रपट निर्माते.
- २००१ - डॉ. वा.द. वर्तक, वनस्पतिशास्त्रज्ञ तसेच देवराई अभ्यासक.
- २००४ - सौंदर्या, दक्षिण भारतीय अभिनेत्री.
- २०११ - वि.आ. बुवा, मराठी विनोदी साहित्यिक.
- २०१२ - वसंत दिवाणजी, कन्नड लेखक.
- २०१२ - नित्यानंद महापात्रा, भारतीय पत्रकार आणि राजकारणी.
- २०१७ - एमो मोरेनो, ११७ वर्षांची इटालियन स्त्री.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
एप्रिल १५ - एप्रिल १६ - एप्रिल १७ - एप्रिल १८ - एप्रिल १९ - (एप्रिल महिना)
|
|