मार्च ५
मार्च ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६४ वा किंवा लीप वर्षात ६५ वा दिवस असतो.
ठळक घटना
अकरावे शतक
- १०४६ - पर्शियन कवी व प्रवासी नसीर खुश्रोने आपल्या सात वर्षांच्या मध्य-पूर्वेच्या भ्रमंतीची सुरुवात केल. या प्रवासाचे वर्णन त्याने सफरनामा या आपल्या पुस्तकात करून ठेवलेले आहे.
सतरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- ११३३ - हेन्री दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १३२४ - डेव्हिड दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
- १५१२ - जेरार्डस मर्केटर, फ्लेमिश नकाशेतज्ञ.
- १८९८ - चाउ एन-लाय, चीनचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१० - श्रीपाद वामन काळे, मराठी संपादक.
- १९१३ - गंगुबाई हनगळ, किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका.
- १९१६ - बिजू पटनायक, ओरिसाचे मुखमंत्री.
- १९२५ - वसंत साठे, ५, ६, ७, ८, ९व्या लोकसभेचे सदस्य.
- १९३७ - ओलुसेगुन ओबासांजो, नायजेरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४२ - फेलिपे गॉन्झालेझ, स्पेनचा पंतप्रधान.
- १९५९ - वाझ्गेन सर्ग्स्यान, आर्मेनियाचा पंतप्रधान.
- १९५९ - शिवराज सिंह चौहान, भारतीय जनता पार्टीनेता.
मृत्यू
- १५३९ - नुनो दा कुन्हा, भारतातील पोर्तुगीझ गव्हर्नर.
- १८१५ - फ्रांझ मेस्मेर, संमोहनविद्येचा ऑस्ट्रियन प्रवर्तक.
- १८२७ - पिएर-सिमोन लाप्लास, फ्रेंच गणितज्ञ.
- १८२७ - अलेस्सांद्रो व्होल्टा, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९१४ - शांताराम अनंत देसाई, मराठी नाटककार, समीक्षक.
- १९५३ - जोसेफ स्टालिन, सोवियेत राष्ट्राध्यक्ष.
- १९५५ - अंतानास मर्किस, लिथुएनियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६३ - पॅट्सी क्लाइन, अमेरिकन गायिका.
- १९६६ - शंकरराव मोरे, साम्यवादी नेता.
- १९६८ - नारायण गोविंद चाफेकर, मराठी समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार.
- १९८५ - पु.ग. सहस्रबुद्धे, महाराष्ट्र संस्कृतीकार.
- १९८५ - देविदास दत्तात्रय वाडेकर, तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक.
- १९८९ - बाबा पृथ्वीसिंग आझाद, गदर पार्टीचे एक स्थापक.
- १९९५ - जलाल आगा, हिंदी चित्रपट अभिनेता.
- २०१० - जी.पी. बिर्ला, भारतीय उद्योजक.
- २०१७ - पी. शिवशंकर, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयातील न्यायाधीश, केंद्रीय कायदामंत्री.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
मार्च ३ - मार्च ४ - मार्च ५ - मार्च ६ - मार्च ७ - (मार्च महिना)
|
|