ह्या दिवशी सूर्य दक्षिण गोलार्धातील अंतिम टोक गाठत असल्याने भारतीय सौर कॅलेंडरच्या ९ वा महिना अग्रहायण मधील हा अंतिम दिवस असून भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये ह्या दिवशी ३० अग्रहायण ही तारीख असते. भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरप्रमाणेच ग्रेगोरीयन कॅलेंडरही सौर कॅलेंडर आहे.
मात्र ग्रेगोरीयन कॅलेंडरमध्ये खगोलशास्त्राला महत्त्व न देता ख्रिस्ती धर्माला महत्त्व दिल्याने सूर्याशी संबंधित महत्त्वाच्या ४ दिवसांपैकी एक दिवस असूनही ख्रिस्ती कॅलेंडरचाना कोणता महिना या दिवशी सुरू होतोना संपतो.
डिसेंबर २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५५ वा किंवा लीप वर्षात ३५६ वा दिवस असतो.
हा उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस असून रात्र सर्वात मोठी असते.
ठळक घटना आणि घडामोडी
सतरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १७९५ - लेओपोल्ड फॉन रांक, जर्मन इतिहासकार.
- १८०४ - बेंजामिन डिझरायेली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८७९ - जोसेफ स्टालिन, १९२२ ते १९५३ पर्यंतसोवियेत युनियनचा नेता.
- १९०३ - भालचंद्र दिगंबर गरवारे उद्योगपती.प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार, पद्मभूषण, डि. लिट. (पुणे विद्यापीठ), उद्योजक
- १९२१ - पी.एन. भगवती भारताचे सतरावे सरन्यायाधीश
- १९३२ - यू.आर. अनंतमूर्ती, ज्ञानपीठविजेते लेखक.
- १९३२ - अमीन सयानी, रेडियो निवेदक.
- १९३५ - दत्ता टोळ, मराठी बालसाहित्यिक.
- १९४२ - हू चिंताओ, चीनचे नागरी गणतंत्रचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५४ - क्रिस एव्हर्ट-लॉईड, ब्रिटिश टेनिस खेळाडू.
- १९५९ - कृष्णम्माचारी श्रीकांत, भारतीय क्रिकेट खेळाडू, संघनायक आणि निवड समितीचे अध्यक्ष.
- १९६३ - गोविंदा, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९६७ - मिखाइल साकाश्विलि जॉर्जियाचा राष्ट्राध्यक्ष.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
डिसेंबर १९ - डिसेंबर २० - डिसेंबर २१ - डिसेंबर २२ - डिसेंबर २३ - (डिसेंबर महिना)