जानेवारी ९
जानेवारी ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९ वा किंवा लीप वर्षात ९ वा दिवस असतो.
ठळक घटना
- तेरावे शतक
- चौदावे शतक
- पंधरावे शतक
- अठरावे शतक
- एकोणिसावे शतक
- विसावे शतक
- एकविसावे शतक
- २००१ - चीनने शेन्झू २ या मानवरहित अंतराळयानाचे प्रक्षेपण केले.
- २००१ - नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला
- २००१ - नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.
- २००२: महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले.
- २००३ - जमिनीवरून जमिनीवर मारा करु शकणाऱ्या 'अग्नी १ 'या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ओरिसामधील बालासोर येथे यशस्वी चाचणी
- २००७: स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.
- २०११ - इराण एर फ्लाइट २७७ हे बोईंग ७२७ प्रकारचे विमान इराणच्या पश्चिम अझरबैजान प्रांतातील उर्मिया शहरात कोसळले. ७०पेक्षा अधिक ठार.
- २०१५ - व्हिस्टारा ह्या भारतीय प्रवासी विमानकंपनीच्या कार्यास सुरुवात.
जन्म
- १५५४ - पोप ग्रेगोरी पंधरावा.
- १६२४ - मैशो, जपानी सम्राज्ञी.
- १८५९ - जेम्स क्रॅन्स्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८७ - डॅन टेलर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८८९ - वृंदावनलाल वर्मा, हिंदी साहित्यिक.
- १९१३ - रिचर्ड निक्सन, अमेरिकेचे ३७वे अध्यक्ष
- १९१८ - प्रभाकर उर्ध्वरेषे, मराठी लेखक.
- १९२२ - हरगोविंद खुराना, नोबेल-पुरस्कृत भारतीयवंशी जैव-रसायनशास्त्रज्ञ.
- १९२६ - कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९२७ - रा.भा. पाटणकर, सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक, समीक्षक.
- १९३४ - महेंद्र कपूर, भारतीय पार्श्वगायक.
- १९३८ - चक्रवर्ती रामानुजम, भारतीय गणितज्ञ.
- १९५१ - पं. सत्यशील देशपांडे, ख्यालगायक, पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य.
- १९५६ - डेव्हिड स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - फराह खान, भारतीय नृत्यदिग्दर्शक.
- १९६८ - जिमी ॲडम्स, वेस्ट-इंडियन क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - गॅरी स्टेड, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - क्रेग विशार्ट, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - फरहान अख्तर, हिंदी अभिनेता, दिग्दर्शक, गायक.
- १९८३ - शरद मल्होत्रा, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९८९ - हॅरीस सोहेल, पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू
मृत्यू
- १२८३ - वेन तियान्शिंग, चीनी पंतप्रधान(मृत्युदंड).
- १८४८ - कॅरॉलीन हर्शेल - खगोलशास्त्रज्ञ.
- १८७३ - नेपोलियन तिसरा, फ्रेंच सम्राट.
- १८७८ - व्हिक्टर इमॅन्युएल दुसरा, इटलीचा राजा.
- १९२३ - सत्येंद्रनाथ टागोर, पहिले भारतीय सनदी अधिकारी (आयसीएस).
- १९६१ - एमिली ग्रीन बाल्च, अमेरिकन लेखिका.
- १९७५ - प्योत्र सर्जेयेविच नोव्हिकोव्ह, रशियन गणितज्ञ.
- १९९५ - मधू लिमये, स्वातंत्र्यसैनिक व समाजवादी विचारवंत
- १९९७ - एडवर्ड ओसोबा-मोराव्स्की, पोलंडचा पंतप्रधान.
- १९९८ - केनिची फुकुई, नोबेल पारितोषिक विजेता जपानी रसायनशास्त्रज्ञ.
- २००३ - कमर जलालाबादी, कवी.
- २००४ - शंकरबापू आपेगावकर- राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक.
- २०१३ - जेम्स बुकॅनन, नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ज्ञ.
- २०१८ - हू जिंताओ, चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
जानेवारी ७ - जानेवारी ८ - जानेवारी ९ - जानेवारी १० - जानेवारी ११ - (जानेवारी महिना)
|
|