जानेवारी १७
जानेवारी १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७ वा किंवा लीप वर्षात १७ वा दिवस असतो.
ठळक घटना
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
- १९१२ - अमुंडसेननंतर एक महिन्याने रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोचला.
- १९१७ - अमेरिकेने डेन्मार्ककडून व्हर्जिन आयलंड २,५०,००,००० डॉलरला विकत घेतले.
- १९४५ - रशियन सैन्याने पोलंडची राजधानी वॉर्सो काबीज केले. युद्धात शहर संपूर्ण उद्ध्वस्त झालेले होते.
- १९४५ - रशियन सैन्य जवळ येताना पाहून नाझींनी ऑश्विझ कॉंन्सेन्ट्रेशन कॅम्प रिकामा करायला सुरुवात केली.
- १९४६ - संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने आपले पहिले अधिवेशन सुरू केले.
- १९५० - बॉस्टनमध्ये ११ लुटारूंनी २०,००,००,००० डॉलर पळवले. अंतर्गत वादात त्यापैकी तिघांचा खून झाला व आठ जणांना शिक्षा झाली. लुटीचे पैसे आजतगायत मिळालेले नाहीत. हे पैसे ग्रांड रॅपिड्स, मिनेसोटाजवळ लपवून ठेवले असल्याची वदंता आहे.
- १९५६ - बेळगाव - कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा.
- १९६६ - स्पेनमध्ये पालोमारेस गावाजवळ अमेरिकेच्या बी.५२ बॉम्बर व के.सी.१३५ जातीच्या विमानात टक्कर. बी.५२ मधून तीन ७० कि.टन क्षमतेचे हायड्रोजन बॉम्ब जमिनीवर पडले व एक समुद्रात.
- १९७३ - फिलिपाईन्सने फर्डिनांड मार्कोसला आजन्म अध्यक्ष घोषित केले.
- १९९१ - आखाती युद्ध - ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म पहाटे सुरू. इराकने इस्रायेल वर ८ स्कड क्षेपणास्त्रे सोडली. इस्रायेलकडून प्रत्युत्तर नाही.
- १९९१ - ओलाफ पाचव्याच्या मृत्यूनंतर हॅराल्ड पाचवा नॉर्वेच्या राजेपदी.
- १९९४ - नॉर्थरिज, कॅलिफोर्नियात ६.९ मापनाचा भूकंप.
- १९९५ - जपानमधील कोबेत ७.३ मापनाचा भूकंप. ६,४३३ ठार. अपरिमित वित्तहानी.
- २००२ - कॉॅंगोमधील माउंट न्यिरागोन्गो या ज्वालामुखीचा उद्रेक. ४,००,००० बेघर.
एकविसावे शतक
जन्म
- १५०५ - पोप पायस पाचवा.
- १७०६ - बेंजामिन फ्रॅंकलिन, अमेरिकन लेखक, संशोधक, प्रकाशक व राजदूत.
- १८९५ - विठ्ठल दत्तात्रय घाटे, मराठी लेखक, शिक्षणतज्ञ.– रविकिरण मंडळातील एक कवी
- १८९९ - अल कपोन, अमेरिकन माफिया.
- १९०५ - दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, भारतीय गणितज्ञ.
- १९०६ - शकुंतला परांजपे, भारतीय समाजसेविका.
- १९०८ - एल.व्ही. प्रसाद तथा अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव, हिंदी चित्रपट निर्माता व दिग्दर्शक.
- १९०८ - ब्रायन व्हॅलेन्टाइन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१३ - यादवेंद्रसिंघ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९१७ - एम. जी. रामचंद्रन, तमिळ चित्रपट अभिनेता आणि तामिळनाडुचे मुख्यमंत्री.
- १९१८ - सईद अमीर हैदर कमाल नक्वी ऊर्फ ’’कमाल अमरोही’’, हिंदी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी.
- १९१८ - रुसी मोदी, टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक.
- १९२५ - अब्दुल कारदार, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९२६ - क्लाइड वॉलकॉट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९२८ - केन आर्चर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९३१ - जेम्स अर्ल जोन्स, अमेरिकन अभिनेता.
- १९३२ - मधुकर केचे, मराठी साहित्यिक.
- १९३९ - अंताव डिसूझा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९४२ - मुहम्मद अली, ऊर्फ कॅशिअस क्ले – अमेरिकन मुष्टियोद्धा. अमेरिकन वर्णभेदाचा निषेध म्हणून त्याने धर्मांतर करून मुहम्मद अली हे नाव स्वीकारले.
- १९७७ - मॅथ्यू वॉकर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ३९५ - थियोडोसियस पहिला, रोमन सम्राट.
- १७७१ - गोपाळराव पटवर्धन, पेशव्यांचे सरदार
- १८२६ - हुआन क्रिसोस्तोमो अर्रियेगा, स्पॅनिश संगीतकार.
- १८९३ - रदरफोर्ड बी. हेस, अमेरिकेचा १९वा राष्ट्राध्यक्ष.
- १९६१ - पॅट्रिस लुमुम्बा, कॉंगोचा पंतप्रधान.
- १९७१ - बॅ. नाथ पै, भारतीय स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ
- २००० - सुरेश हळदणकर, जुन्या पिढीतील गायक आणि अभिनेते.
- २००५ - झाओ झियांग, चीनचा राष्ट्राध्यक्ष.
- २०१० - ज्योति बसू, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री.
- २०१३ - ज्योत्स्ना देवधर, मराठी व हिंदी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या.
- २०१४ - सुचित्रा सेन, बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- २०२० - बापू नाडकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
जानेवारी १५ - जानेवारी १६ - जानेवारी १७ - जानेवारी १८ - जानेवारी १९ - (जानेवारी महिना)
|
|