डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: NAG, आप्रविको: VANP) हे भारताच्यामहाराष्ट्र राज्यातील नागपूर येथील विमानतळ आहे. याचे मुळचे नाव सोनेगांव विमानतळ आहे. हे महाराष्ट्रातील १८ विमानतळांपैकी एक आहे. येथून मुंबई व दिल्लीसह भारतातील अनेक मोठी शहरे तसेच शारजा, दुबई आणि दोहा येथे विमाने जातात-येतात.
नागपूर विमानतळावर नुकतीच इंड्रा ही रडार प्रणाली लावण्यात आली आहे. अशी प्रणाली लागणारे हे भारतातील पहिला विमानतळ आहे. नागपूरच्या आकाशातून दररोज सुमारे ६५० विमानांची ये-जा असते.[१]
या विमानतळास, भारताच्या नागरी उड्डयन महासंचालक कार्यालयाद्वारे नुकताच संकेत 'ई' (कोड-ई) हा दर्जा देण्यात आलेला आहे. याद्वारे बोईंग ७७७, बोईंग ७४७, बोईंग ७८७ या श्रेणीची महाकाय विमानेही येथे उतरू शकतील. येथे एर इंडियाचा एमआरओ (?) देखील तयार झाला आहे.[२]