शारजा (अरबी: الشارقة) हे पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिराती ह्या देशामधील तिसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर (दुबई व अबु धाबीखालोखाल) व शारजा अमिरातीचे राजधानीचे शहर आहे.[१] शारजा शहर शारजा अमिरातीच्या उत्तर भागात पर्शियन आखाताच्या दक्षिण किनाऱ्यावर वसले आहे. दुबई-अजमान-शारजा ह्या महानगरामधील एक मोठे शहर असलेल्या शारजाची लोकसंख्या २००८ साली सुमारे ८ लाख होती.
शारजा हे एक अमिरातीमधील एक सुबत्त शहर असून त्याला अनेक शतकांचा इतिहास लाभला आहे. सध्या शारजा शहर देशाच्या एकूण जी.डी.पी.च्या ७.४ टक्के वाट्यासाठी कारणीभूत आहे. येथील शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील आघाडीच्या व वर्दळीच्या विमानतळांपैकी एक आहे. २००८ सालच्या जागतिक मंदीचा फटका शारजाच्या स्थावर उद्योगाला देखील बसला परंतु त्यामधून शारजा बाहेर येत आहे.[२]
वाहतूक
शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा अमिरातीमधील वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असून एर अरेबिया ह्या विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय येथेच आहे.
खेळ
क्रिकेट हा शारजामधील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहेत. येथील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम १९८० व ९० च्या दशकात एक लोकप्रिय क्रिकेट मैदान होते. सध्या अफगाणिस्तान क्रिकेट संघ आपले सामने शारजामधून खेळतो. २०१४ इंडियन प्रीमियर लीगमधील सुरुवातीचे अनेक सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात आले होते ज्यांपैकी काही शारजामध्ये देखील आयोजीत करण्यात आले होते.
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे