भारतीय बौद्ध महासभा


भारतीय बौद्ध महासभा (इंग्रजी: The Buddhist Society of India) ही एक बौद्ध संस्था वा संघटना आहे. या संघटनेचे पंजीकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, संस्थेचा रजिस्टर्ड नं. ३२२७/५५-५६ हा आहे. सोसायटीची घटना पुढील प्रमाणे आहे.

भारतीय बौद्ध महासभा किंवा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही ४ मे १९५५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली एक भारतीची राष्ट्रीय बौद्ध संघटना आहे.[][][] याचे मुख्यालय मुंबई मध्ये असून सध्या या संघटनेते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मिराताई आंबेडकर कार्य करत आहेत.[] ही संघटना आंतरष्ट्रीय बौद्ध संघटना वर्ल्ड फिलोशिप ऑफ बुद्धिस्ट्सची सदस्य आहे.[][][]

नियम

  • सोसायटीचे नाव दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हे असेल.
  • सोसायटीचे पंजीकृत कार्यालय मुंबई येथे आहे.

उदिष्टे

भारतीय बौद्ध महासभेची उदिष्टे खालिलप्रमाणे आहेत.

  1. भारतात बौद्ध धम्माच्या प्रचारास चालना देणे.
  2. बौद्ध धम्म उपासनेसाठी बौद्ध मंदिरे (विहार) स्थापन करणे.
  3. धार्मिक व वैज्ञानिक विषयांकरीता शाळा व महाविद्यालये स्थापन करणे.
  4. अनाथालय, दवाखाने व मदत केंद्रे (आधरगुहे) स्थापन करणे.
  5. बौद्ध धम्माच्या प्रसाराकरीता कार्यकर्ते तयार करण्यासाठी बौद्ध प्रशिक्षण केंद्र (सेमीनरीज) स्थापन करणे.
  6. सर्व धम्माच्या तुलनात्मक अध्ययनास प्रोत्साहन देणे.
  7. सर्वसामान्य लोकांना बौद्ध धम्माचा खरा अर्थबोध करून देण्यासाठी बौद्ध साहित्य प्रकाशित करणे आणि हस्तपत्रके व छोट्या पुस्तिका काढून त्याचे वितरण करणे.
  8. गरज भासल्यास धर्मोपदेशकांचा नवा संघ निर्माण करणे.
  9. बौद्ध धम्माच्या प्रचारार्थ प्रकाशनाचे कार्य सुरू ठेवण्यासाठी मुद्रणालय किंवा मुद्रणालये स्थापन करणे.
  10. भारतीय बौद्धांच्या सामायिक कृतीसाठी आणि बंधुभाव स्थापन (संवर्धन) करण्यासाठी मेळावे आणि परिषदा भरविणे.
  11. सामाजिक समता स्थापीत करने

अधिकार

भारतीय बौद्ध महासभेची अधिकार खालिलप्रमाणे आहेत.

  1. सोसायटी साठी देणग्या स्वीकारने व निधी गोळा करणे.
  2. धम्मोपदेशकांचा सांभाळ करणे.
  3. सोसायटीच्या उदेशांकरिता संस्थेची मालमत्ता विकणे अथवा गहान करणे.
  4. मालमत्ता धारण करणे व ताब्यात ठेवणे.
  5. सोसायटीकरीता मालमत्ता विकत घेणे, भाडे कराने घेणे किंवा अन्य प्रकारे मिळवणे आणि काळ प्रसंगाच्या निच्शितीनुसार सोसायटीच्या पैशाची गुंतवणूक व व्यवहार करणे.
  6. सोसायटीच्या उदिष्टांकरीता घरे, इमारती किंवा बांधकामाची रचना करने, त्याची निगा राखने, पुर्नरचना करणे, फेरफार करणे, बदलने किंवा पुर्नस्थापित करणे.
  7. सोसायटीची सर्व किंवा कोणतीही मालमत्ता विकणे, निकालात काढणे, सुधारणे, व्यवस्थित ठेवणे, विकसित करणे, विनिमय करणे, भाड़ेकरार करणे, गहाण ठेवणे, सुपुर्द करणे किंवा व्यवहाराचा करार करणे.
  8. सोसायटीच्या ध्येय व उदिष्टांची पुढील वाटचालीतील सुरक्षितेचा दृष्टिकोण बाळगुण सोसायटी, सोसायटी द्वारा चालवीत असलेल्या किंवा सोसायटीशी संबंधीत असलेल्या कोणत्याही संस्थेद्वारे अथवा सोसायटी द्वारा इतर कोणत्याही संस्था अथवा संस्थाशी सहकार्य करणे, संयुक्त करणे किंवा संलग्न करणे.
  9. सोसायटीचे कोणतेही हेतु, ध्येय व उदिष्टांच्या पुर्तेंत साठी जामीन ठेवून ठेवून (सुरक्षा ठेव) अथवा न ठेवता पैसा उभारणे.
  10. उपनिर्दिष्ट कोणतेही ध्येय व उदिष्टे साध्य करण्यासाठी प्रसंगानुरूप किंवा त्यास पूरक अन्य कायदेशीर कृती व कार्य करणे.

सभासदस्यत्व

संस्थेचे सभासदांचे पुढील प्रकारे दोन वर्ग असतील :

१) सभासद २) सहयोगी सभासद

१) सभासदस्यत्वा साठी अटी : सभासद कोण होऊ शकतो ? :- सोसायटीने निर्धारित व नियमित केलेल्या धम्म दीक्षा विधिचे अनुकरण करुण बौद्ध धम्माआचरनास सुरुवात करणारी व सोसायटीची पूर्ण वार्षिक वर्गनी शुल्क देणारी कोणतीही व्यक्ति सोसायटीचा सभासद होण्यास पात्र असेल.

२) सहयोगी सभसदत्व :- सहयोगी सभासदत्व कोण होऊ शकतो :- सोसायटीच्या ध्येय व उदिष्टांशी सहानभूति ठेवणारया व बौद्ध धर्माला विरोध न करणाऱ्या कोणतीही व्यक्तिला सोसायटीची वार्षिक वर्गनी शुल्क देऊन सहयोगी सभासद करता येवु शकते.

3) सभासदत्वाच्या मर्यादा (बंधन) तरतुदीप्रमाणे, अध्यक्ष कोणत्याही विशिष्ट बाबतीत ठरवु शकतो को, कोणताही सभासद , जरी त्याने धममदिक्षेच्या विधिचे अनुकरण केले असले तर, त्याला नेमुन दिलेल्या काळा पर्यंत शिकवु सभासद राहील.

४) शिकावु सभासद व सहयोगी सभासद सल्लागार समिती व जन समितीचे सभासद होण्यास पात्र राहणार नाही व त्याना मतदानाचा अधिकार नसेल.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Omvedt, Gail (17 April 2017). "Ambedkar: Towards An Enlightened India". Random House Publishers India Pvt. Limited – Google Books द्वारे.
  2. ^ Naik, C. D. (2010). Buddhism and Dalits: Social Philosophy and Traditions (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 9788178357928.
  3. ^ Quack, Johannes (2011). Disenchanting India: Organized Rationalism and Criticism of Religion in India. Oxford University Press. p. 88. ISBN 978-0199812608. OCLC 704120510.
  4. ^ "TBSI, (Official) - Welcome". www.tbsi.org.in. 2018-06-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-10-30 रोजी पाहिले.
  5. ^ Studio, Zubvector. "The World Fellowship of Buddhists". wfbhq.org.
  6. ^ Kantowsky, Detlef (2003-01-01). Buddhists in India Today: Descriptions, Pictures, and Documents (इंग्रजी भाषेत). Manohar Publishers & Distributors. ISBN 9788173045110.
  7. ^ U.G.C.-NET/J.R.F./SET Samajshashtra (Paper-III) (हिंदी भाषेत). Upkar Prakashan. ISBN 9788174823762.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!