डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा भारत सरकारद्वारे देण्यात येणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. याची इ.स. १९९५ मध्ये स्थापना केली गेली. सामाजिक परिवर्तनाचे उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. हा पुरस्कार सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रीय एकात्मता यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीचे प्रतीक आहे. दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो, त्याचे स्वरूप रू. १.५ दशलक्ष (१५ लाख) आणि प्रशस्तिपत्र असे आहे.[१]
निवड समिती
पुरस्कार विजेते निवड करणाऱ्या जूरीमध्ये भारताचे उपराष्ट्रपती (अध्यक्ष), लोकसभा सभापती (उपाध्यक्ष), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष (सदस्य), ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ (सदस्य), एक सामाजिक कार्यकर्ता (सदस्य) आणि सार्वजनिक जीवनातील दोन प्रसिद्ध व्यक्ती (सदस्य) ज्यांपैकी एकाला आंतरराष्ट्रीय घडामोडी अनुभव आहे.
विजेते
हे सुद्धा पहा
संदर्भ